Saturday, December 31, 2016

बीड जिल्ह्याचे वैशिष्ट्ये

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे. More>>>>

 

सिंधू संस्कृती

१९२० च्या सुमारास सिधूनदीच्या खोर्‍यात मोहेंजोदाडो आणि हडप्पा या दोन प्राचीन शहरांचा शोध लागला अशाच प्रकारचे अवशेष नंतर भारतातील कालिबंग...